Saturday, October 18, 2014

For "YOU"



For "YOU"

When I said , I like you...
You thought I weren't serious...
I was and wanted to say I was..I am & I will like you forever...


When I said , I would wait...
You thought I were kidding...
I wasn't and wanted to say I will wait , not for a year or decade but forever...


When I said, I want to be with you...
You thought , I were joking...
I wasn't and wanted to say I love being with you and will be with u without even letting u know...

When I said , I love your company...
You thought, I were lying...
I wasn't and just wanted to say I will accompany you forever...

When I will say , I love you...
I know , you might think , I am flirting ...
But I wouldn't be and will want to say I will love u forever... like I am doing... RIGHT NOW!!!


Saturday, August 24, 2013

तिला लिहिलेली न दिलेली पत्रे ।।। (3)

तिला लिहिलेली  न  दिलेली पत्रे ।।।

प्रिय ,
पुन्हा पत्र लिहायला सुरुवात केलीए...माहित आहे खूपच उशीर झाला  आहे , पण त्यास आता इलाज नाही वेळेची बंधने आडकाठी आणतायेत , जाऊदे त्या साठी पत्र नाही लिहिले, मनमोकळ्या गप्पा माराव्यात तुझ्या सोबत  असे वाटत होते आणि आज थोडा वेळाही आहे …

आता तुझ्याबद्दलथोड्या गोष्टी माहित झाल्या आहेत .( अर्थातच त्या तुझ्या कडून नाही कळल्या ).

साडीची तुला आवड आहे असे काही माहिती अंशी कळले , ते बरोबर कि चूक याची मी शाहनिशा नाही केली , पण तुझ्या फोटोमधून त्याची प्रचीती आलीच. फोटो आणि प्रत्यक्ष पाहण्यात तसा जमीन अस्मानाचा फरक ...

म्हणूनच तुला प्रत्यक्ष साडीत पाहण्यासाठी मन अधीर झाले होते ... चातक जसा पावसाच्या थेंबाची वाट पाहत असतो त्या प्रमाणे मी हि तुला साडीत पाहण्यासाठी आतुर झालो होतो .(exaggeration)

ज्या क्षणाची मन आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आलाच!!! (ऑफिस मधला ट्रेडीशनल डे )

त्या रुपात तुला तसेच्या तसे साठवून घेतलेय. ती वेळ , तो क्षण .... आता लिहिताना ते वर्णन फारच फिके वाटत्ये ....[ ज्याप्रमाणे तुला साडीत पाहिल्यावर बाकी सारेच फिके झाले होते.].

आता मला खरच नाही सांगता येणार कि तू कशी दिसत होतीस  , माझी रिअक्श न काय होती तुला पहिल्यांदा साडीत प्रत्यक्ष पाहताना किव्वा माझ्या हृदयाची स्पंदने किती पत्तिनी वाढली होती. हे सारे ज्याने मला तेव्हा पहिले त्यालाच  माहिती.

माझ्या तोंडून "ओह्ह्ह्ह माय गॉड !!! Am i watching a Dream? wo white sari me Pari hai kya ?" असे काही शब्द निघाले होते  असे मला कोणाकडून तरी कळले.

इतके सुंदर कोणी दिसू शकते का? सफेद रंगाच्या पोशाखात एखादी परी जशी  दिसते त्या प्रमाणेच दिसत होतीस केवळ हातात एक चांदणी असलेली काठी दिली असती तर ditto same. ;)

तुला पुनः पुन्हा त्या रुपात पाहण्याची माझी कसरत सुरु होती , त्या दिवसात माझ्याकडून किती आणि कसे काम झाले हे विचारूही नका. मला स्वतःलाच माहित नव्हते मी पूर्ण  दिवस केले काय ? काही करायला घेतले कि माझ्या समोर "परी" उभिच .

असा सुंदर अनुभव आयुष्यात पहिल्यांदाच आला होता त्यामुळे तो अनुभवण्यात एक प्रकारची वेगळीच मजा येत होती ,काम  काय रोजचेच  आहे असे क्षण पुन्हा थोडीच येणार आहेत? असे मनाला पटवून कामापासून थोडा काना डोळा केला ;) .

का कुणास ठाऊक तो दिवस तसाच थांबवा असे वाटत होते , तुला त्या रुपात पाहतच  राहावे हे मनोमन वाटत होते , काय करणार कितीही इच्छा असली तरी  सगळेच  मनासारखे घडत नाही ना , तुला साडीत प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा मात्र पूर्ण  झाली होती त्याचेच समाधान.....

चल थांबायला  हवे आता , पण आता नियमित  पत्र लिहिणार असा निश्चये केलाय. :)

भेटू लवकरच …।

तुझाच,





Saturday, October 6, 2012

तिला लिहिलेली न दिलेली पत्रे ।।। (2)


तिला लिहिलेली  न  दिलेली पत्रे ।।।

                                                                      


प्रिय ,
        पुन्हा पत्र लिहीन याचा विचार केला होता पण तो योग इतका लवकर येईल असे वाटले नव्हते .
पण हा पाऊस म्हणजे एक विलक्षण आहे. त्याच्या कोसळणाऱ्या सरींमध्ये तुझी आठवण न यावी तर नवलच...
तो आपला कोसळतो हवा तेव्हा हवा तसा .पण त्याच्या  प्रत्येक सरीत तुझी आठवण देऊन जातो . त्याचे काय पडल्यावर वाट मिळेल तिथे वाहत जायचे, प्रवाहात विलीन होऊन जायचे.

पण माझ्या मनात जागृत झालेल्या आठवन्नीचे, भावनांचे काय ? त्यांना जायला कुठे वावच नाही.त्या एकदा जागृत झाल्या की बाकी कशातच मन लागत नाही , नेहमी तुझाच विचार येत राहतो.आणि पाऊस पडून गेल्यावर पावसाचे पाणी रिते होऊन जाते तुझ्या आठवन्नीचे तसे कुठे आहे उलट प्रत्येक सरी गणिक  त्या मजबूतच होत जातात.

पाऊस  पडू लागला कि तो दिवस आठवल्या शिवाय राहत नाही , अर्थातच त्या दिवसात तुझे वास्तव्य होते म्हणूनच तो दिवस हृदयात अश्या प्रकारे कोरला गेलाय की पावसाचा एक थेंब ही त्याची आठवण आणण्यास पुरेसा आहे.

कंपनी च्या आत शिरताना पावसाचे येणे , आपली छत्री उघडून तुझी ब्याग आणि स्वतःला न भिजू देण्याची कसरत पाहण्यात एक वेगळीच मजा येत होती , त्या वेळी पाऊस  आला म्हणून तुझ्या मनात राग नव्हता पण थोडासा उशिरा आला असता तर काय बिगाडले असते अशा प्रकारचे काहीतरी भाव तुझ्या चेहऱ्यावर होते.
तुझ्या त्या कसरतीत काही पाण्याचे थेंब जिंकले होते त्यांनी थेट तुझ्या चेहऱ्यावर आपली जागा बनवली होती, त्या टपोरया बिन्दू मुळे तुझा चेहरा अजूनच खुलून दिसत होता. तुझे ते गोंडस रूप तसेच्या तसे माझ्या मनात साठवून ठेवलेय आणि अशा पावसात ते रूप चेहऱ्या समोर आले म्हणजे सारे काही सुंदर भासू लागते.

चल थांबायला हवे आता ,पाऊस तर कधीचाच थांबलाय, माझ्या मनाचे तसे नाही ना , तुझ्या आठवणीत गुंतल्यावर त्यातून बाहेर पडणे म्हणजे  एक दिव्यचं...

पुन्हा पत्र  लिहीनच ...

तुझाच,

Friday, September 7, 2012

तिला लिहिलेली न दिलेली पत्रे ।।।

                                            तिला लिहिलेली  न  दिलेली पत्रे ।।।

                                                                     

ही पत्रे मी प्रवीण कुलकर्णी (सकाळ दैनिकात लेखन करणारे ) यांनि लिहिलेल्या काही पत्रांतून प्रेरणा घेऊन लिहिण्याचा प्रयत्ने करत आहे . काही ओळी त्यांनी लिहिलेल्या पत्रांतून वापरल्या आहेत .

प्रिय ,
       पत्र लिहावे असे खूप दिवसांपासून मनात होते , पण धाडसच होत नव्हते  .अगदी खरे सांगायचे झाल्यास मनात एक प्रकारची भीती होती , काय वाटेल आणि .... पण आता तुला हि पत्रे द्यायचीच नाहीत म्हणून सुरवात करतोये .

प्रिय ,
       खरेतर पहिल्याच पत्रात "प्रिय " लिहिताना हाथ अडखळ् तोये  , तरी तुला हृदयात दिलेल्या स्थानामुळे "प्रिय " लिहायला धजावतोय . बघावयास गेले तर "प्रति " पासून "प्रिय " पर्यंतचा प्रवास मोठाच  .माझ्या अधिरतेने म्हण किव्वा दुसर्या कुटल्या कारणाने म्हण इतका प्रवास माझ्या अधीर मनाने होणे शक्य नाही  .
नाही तरी हा "प्रिय " तुझा कुठे आहे . तो तर माझा आहे फक्थ माझा . तुलाही मी प्रिय वाटलो पाहिजे  हा काही आग्रह नाही ( अपेक्षा मात्र आहे ) . पत्रास कारण कि , ...... खरच काही कारण असावे का असे पत्र लिहावयास ? तसे म्हटले तर कारण एकाच तुझ्या बद्दल काय वाटते  याला वाट करून देणे , मनातच साठवून ठेवलं तर आठवण  बनून त्रास होऊ लागतो त्यांचा ...

ज्या वेळी तुला पाहिले तेव्हापासूनच तुला जाणून घायची इच्छा मनी बळावत गेली।त्या क्षणा पासूनच हृदय तुला स्वाधीन केलेय , एव्हाना तुला याची कल्पना आली  असेलच .तू समोर असताना तुझ्याकडे एकटक पाहण्याशिवाय  दुसरा पर्याय माझ्याकडे उरतच नाही , हा एकटक माझ्या कडे पाहणारा वेडा कोण? असा प्रश्न नक्कीच तुला पडला असणार .... नाही का?

तुझ्या मनात काय आहे हे मला माहित नाही , तुझ्या आ यु श्या त  कोणी आहे कि नाही याचा मला थांग पत्ता ही नाही, पण तू मला आवडतेस यात दुमत नाही .

पत्र  थोडं लांबलय , काय करू पहिलाच प्रयत्न  होता . काय लिहू नि काय नको हेच समाजात नव्हते , पुढेही  पत्र  लिहायची  आहेतच की ( फक्थ तुला हि पत्रे  मिळणार नाहीत याची काळजी घेत लिहिणार आहे )...

पुन्हा भेटूच .....

तुझाच ,



Friday, March 9, 2012

मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

"ज्याने अनुभवले त्यालाच माहीत" या उक्ती प्रमाणेच "ज्याने शाळेत धम्माल केली(शाळा अनुभवली ) त्यालाच शाळेची खरी किंमत माहीत", त्या वयात जी काही मस्ती , मजा केली ती आठवली  की आपण बदलल्याची,  कुठेतरी हरवलो  असल्याची पावती मिळते आणि मन पुन्हा शाळेत जाण्याचा धावा करू लागते. ( पुन्हा शाळेत का जायचे?  काही गोष्टी मनात घर करून राहिल्यात  , त्यातील थोडक्या खाली लिहून पाहतोय )

शाळेत गेलेल्या प्रतेकासाठीच...

मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

शाळेचा गणवेश घालून , पुन्हा एकदा शालेय जीवन अनुभवायला...
दरवर्षी नवीन इयत्ता, नवीन वह्या , वर्ग , पुस्तके हाताळायला...
मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

सकाळी सकाळी प्रतिज्ञा आणि प्रार्थना म्हणायला...
२६ जानेवारी , १५ ऑगस्त ला स्काऊटच्या वेशात घोषणा ठोकायला...
मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

भूक लागली असताना ,शिक्षक शिकवत असताना चोरून डबा खायला...
वर्गात ,व्हरांड्यात ,मैदानात झाडाच्या सावलीत डबा खायला...
मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

एका P. T. च्या तासाची आणि रविवारची वाट पाहण्यात...
 पूर्ण आठवडा शाळेत व्यतीत करायला...
मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

हाथ मागे ठेवून रांगेत चालताना एकमेकांना धक्का द्यायला...
फळ्यावर नाव आले असताना, घोळक्यातून पट्टीचा मार न खाताच बाहेर येऊन नाटकी विव्हळायला...
मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

क्याम्प च्या वेळी शेकोटी पेटवून धमाल नाटके करायला...
काहीही नसताना एक विरंगुळा म्हणून एकमेकांना मुलींच्या नावाने चिडवायला...
मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

वर्गात बसून फुली-गोळा, football , cricket खेळायला...
Writing Pad ची Bat , रबर किव्वा मोज्याच्या Ball ने Cricket खेळायला...
मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

कोणाचा पेन, पेन्सील strong आहे हे (पेन fight ने ) शोधायला...
पावसाळ्यात शाळेच्या पटांगणात खिडकीतून होड्या सोडायला...
मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

पैसे साठवून हातगाडी वरचा  गोळा, चिंचा खायला...
बाई मारतील या धाकाखाली अभ्यास करायला...
मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

शिक्षकांच्या  नजरेआड त्यांच्याच वेगवेगळ्या नकला करायला...
वेळप्रसंगी त्यांच्या शिकवण्याला, समजावण्याला  दाद द्यायला...
मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

गृहपाठ न करता (मनात घाबरतच ) शायनिंग मारत फिरायला...
न वाचावीत अशी पुस्तके तास सुरु असताना चोरून वाचायला...
मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

आपल्या लाईनकडे कोणालाही न कळता पाहायला...
नजरानजर झाल्यावर आपण त्या कुळातलेच  नाही असे भासवायला...
मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

तिमाही , सहामाही... वार्षिक परीक्षा देण्यातली मजा अनुभवायला...
आणि त्यानंतर येऊ घातलेल्या सुट्टीचे (परीक्षा देत असतानाच) Planning  करायला...
मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

सर्व चिंता,  असूया,  राग , लोभ  विसरायला...
कसे वागावे , कसे बोलावे  योग्य ते काय ? अयोग्य ते काय?  याचा जास्त विचार करायला...
मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

ह्या Selfish जगापासून थोडे दूर जायला...
ते शाळेचे Selfless जग पुन्हा अनुभवायला...
मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

मला पुन्हा एकदा शाळेत जायचय...

Saturday, February 11, 2012

एक सुंदर परी...

शाळा चित्रपट पाहिला, एक न विसरण्या जोगी गोष्ट म्हणजे शिरोडकर aka  केतकी माटेगावकर.
या चित्रपटात ती ज्या प्रकारे वावरलीय, तिचा तो सहज सुंदर अभिनय, तीच ते लाजणे , केसात फुल माळणे, फक्थ डोळ्यांनी इशारे करणे (बुद्धिबळ खेळताना) , तिचा तो गोड आवाज (No doubt, मी तिला  कुठे तरी पाहिल्याचे  राहून राहून वाटत होते पण  आठवत नव्हते आणि तिने शब्द उच्चारताच डोक्यात लक्ख प्रकाश पडला "  सा रे ग म प "  )  , आणि सर्वात महत्वाची चेह ऱ्यावरची  निरागसता ,  सार सार मनात भरून राहिलय, तिचे ते बोलके डोळे आणि 
गालातल्या गालात हसणे या दोनच गोष्टी जरी तिने पूर्ण चित्रपटात केल्या असत्या  तरी चालले असते 
असे वाटते (तिचा अभिनय इतका सुंदर होता की त्यासाठी कुठल्याही DIALOG ची गरज नव्हती सारे काही तिच्या डोळ्यातून आणि हसण्यातून प्रेक्षकांच्या (माझ्या) थेट हृदयापर्यंत पोहचत होते :-) )

मोती कलर च्या फ्रॉक मध्ये , गुढ्या पर्यंत रुळणाऱ्या केसांमध्ये ती एका परी सारखीच  भासली
त्या परी साठीच...  


एक सुंदर परी...


स्वप्नात आली एक सुंदर परी 
सांगत होती ती मला काहीतरी...

राहून राहून वाटत होते, पाहिलेय तिला कुठेतरी 
मी तर फिदा झालो तिच्या दिसन्यावरी... 

रेखीव भुवया, गालावरच्या खळ्या 
तिच्या मुळे उमलल्या हिरमुसलेल्या कळ्या...

पाणीदार  डोळे, चेह्र्यावरचा तीळ 
त्यातात गुंतला हा वेडा जीव...



हाथ धरून ती माझा, घेऊन गेली स्वप्नांचा देशा
स्वप्नवतच होते सारे , प्रसन्न आणि आल्हाददायक...

जुन्या आठवणी  झाल्या ताज्या,मीही राहिलो  नाही माझा
स्वतःला शोधण्यात येत होती एक वेगळीच मजा...

कोवळे वय , अल्लड भाषा स्वप्नवतच होते लेका
निरागस, निष्पाप  प्रेमाची  अनुभूती, त्याच वेळी त्याच देशा...

माणसांमध्ये माणुसकी  , दुसर्याला मदत करण्याची प्रवृत्ती
खेळ, अभ्यास आणि मजा या शिवाय नव्हती कसलीच युक्ती...

एकेक क्षण  मी पुन्हा अनुभवत होतो  जगत होतो
या कलयुगाला   हळूहळू विसरत होतो...

त्यातच जाग आली, पुन्हा स्वप्न शोधू लागलो
पण सारे व्यर्थच, परीही नव्हती आणि तो देशही...

मी तर होतो  याच जगात
लोळत पडलेलो एका  दुर्मिळ स्वप्नात...

मनात उगीचच  विचार तरळला
स्वप्न मिळवीत प्रत्यक्षात उतरवायला...


Wednesday, February 8, 2012

तर काही तरी गोष्ट आहे...




In life, you always hear...
ये तो सब करते है वो किया तो कूच  बात है...

In  Software firms, life is like...
BUG   तो सब धुंडते है
CRASHING BUG धुंडा तो कूच  बात है. :-p 

त्याच धर्तीवर ही कविता,  मराठीत (Dubbed)  :-p 



तर काही तरी गोष्ट आहे...


शब्द तर सगळेच वाचतात
जर  अर्थ  ओळखायला शिकलास
तर काही तरी गोष्ट आहे

डोळ्यात तर सगळेच पाहतात
जर  ते वाचायला शिकलास
तर काही तरी गोष्ट आहे

चेहरा तर सगळेच पाहतात
मन ओळखायला शिकलास
तर काही तरी गोष्ट आहे

आवाज तर सगळेच ऐकतात  
जर शांतते मागील शब्द  ऐकायला शिकलास
तर काही तरी गोष्ट आहे...

एकत्र तर सगळेच चालतात
जर तू  शेवट पर्यंत साथ दिलीस
तर काही तरी गोष्ट आहे...

promise तर सगळेच करतात
जर  स्वतःच एक  वचन बनलास
तर काही तरी गोष्ट आहे...

आणा-भाका तर सगळेच घेतात
मलाच एक शपत बनवलेस
तर काही तरी गोष्ट आहे...

प्रेम तर सगळेच करतात
जर  प्रेमामागची   भावना  अनुभवू  शकलास
तर काही तरी गोष्ट आहे...

तुकड्या तुकड्यात तर सगळेच प्रेम करतात
जर पूर्णपणे स्वीकार केलास
तर काही तरी गोष्ट आहे...


Monday, January 9, 2012

ह्याला जीवन ऐसे नाव

, ह्याला जीवन ऐसे नाव...



जगताना दुख सर्वांच्याच पदरी पडतात
त्यातून बाहेर निघून सुख अनुभवण्यालाच  जीवन असे म्हणतात

( प्रत्येक क्षण सुखी राहण्यात मजा नसते
सुखाच्या क्षणांना योग्यरीतीने अनुभवायलाहि  दुखाची किनार लागते


सुख दुख , अंधार आणि प्रकाशा प्रमाणे आहेत
जसा अंधारा शिवाय  प्रकाशाला  तसाच दुखाशिवाय सुखांना अर्थ नाही )

मिळालेल्या सुखांमुळे हुरळून जाणे, दुखांमुळे खचून जाणे खूपच सोप्पे आहे
परंतु मिळालेल्या धड्यामुळे शिकत जाण्यालाच जीवन असे म्हणतात

प्रेमात प्रत्येक जण यशस्वी होतोच असे नाही
त्या अपयशातून  खरे प्रेम करायला शिकण्यालाच  जीवन असे म्हणतात

आयुष्यात चांगली वाईट अशी अनेक माणसे भेटतात
चाग्लांकडून सुख आणि वाईटाकडून धडा शिकण्यालाच जीवन असे म्हणतात

देव प्रत्येकालाच सर्व काही देतो असे नाही
नसलेल्या गोष्टीचा  विचार न करता परीस्थितिशी   दोन हाथ करण्यालाच जीवन असे म्हणतात

प्रियजन्नाच्या  विरहाने दुखी होणे साहजिक आहे
त्यांच्या सोबत  व्यतीत केलेल्या सुखी क्षणांच्या आठवणीत समाधान मानण्यालाच  जीवन असे म्हणतात


Sunday, January 1, 2012

प्रेमात अशी अवस्था का व्हावी

                       
प्रेमात अशी अवस्था का व्हावी !!!

प्रेमात अशी अवस्था का व्हावी
तिच्या शिवाय   दुसरे काहीच का  न सुचावे ?
सारे असूनही तिच्या शिवाय   ह्या  जीवनात कमतरता का भासावी ?

प्रेमात अशी अवस्था का व्हावी
तिच्या केवळ दिसण्याने हृदयाची स्पंदने का वाढवीत ?
तिला भेटून आल्यावर रात्रभर झोप का न यावी ?

प्रेमात अशी अवस्था का व्हावी
तिला सोडून साऱ्यांनाच माझ्या  प्रेमाबद्दल  कळावे
तीने  मात्र एक मित्र म्हणूनच माझी ओळख सांगावी

प्रेमात अशी अवस्था का व्हावी
तिलाच तिच्याबद्दल (तिलाच न कळता) भरभरून सांगावे
पण "ती" तूच आहेस हेही सांगता का न यावे ?

प्रेमात अशी अवस्था का व्हावी
 जे सांगायचे त्या व्यतिरिक्त सर्वकाही सांगावे
महत्वाची  गोष्ट  मात्र  मुखातून बाहेरच  न यावी

प्रेमात अशी अवस्था का व्हावी
तिच्याशी बोलायला मनाने सर्व तयारी करावी
ती समोर आल्यावर जीभ का अडखळावी ?

प्रेमात अशी अवस्था का व्हावी
मी मैत्रीला प्रेम आणि तीने  प्रेमाला मैत्री म्हणावे
मैत्री आणि प्रेमात अशी गल्लत का व्हावी ???


खरच...
प्रेमात अशी अवस्था का म्हणून व्हावी...???




Thursday, December 29, 2011

सारिका

सारिका (एक व्यक्तिचित्र...)



तिच्या गालावरची खळी
जणू गुलाबाची उमलू पाहणारी नाजूक कळी

तिच्या हाताचा तो नाजूक कोमल स्पर्श
अंगावर रोमांच फुलवणारा मोरपिसाचा अर्क

तिचे ते मनमुराद हसणे
जणू शरदाचे चांदणे

तिचे ते सुंदर लाजणे                          (  तिचे लाजणे जणू 
जणू लाजाळूचे स्वतात सामावणे          मोहरलेली स्पंदने )

तिचा तो गोड मधुर आवाज
जणू कोकिळेचा (सारिकाचा दुसरा अर्थ) आलाप

तिचे  ते  नाजूक  रेखीव  पाणीदार डोळे
जणू  निरागसता आणी निष्पाप मनाचे प्रतीक

तिचे ते दिलखुलास हसणे
जणू मनाला स्वप्नांच्या नगरीत नेणे

तिची प्रत्येक अदा मनाला वेड लावून जाते
मनाच्या  एका  कोपऱ्यात  प्रत्येक गोष्ट घर करून बसते.