प्रेमात अशी अवस्था का व्हावी !!!
प्रेमात अशी अवस्था का व्हावी
तिच्या शिवाय दुसरे काहीच का न सुचावे ?
सारे असूनही तिच्या शिवाय ह्या जीवनात कमतरता का भासावी ?
प्रेमात अशी अवस्था का व्हावी
तिच्या केवळ दिसण्याने हृदयाची स्पंदने का वाढवीत ?
तिला भेटून आल्यावर रात्रभर झोप का न यावी ?
प्रेमात अशी अवस्था का व्हावी
तिला सोडून साऱ्यांनाच माझ्या प्रेमाबद्दल कळावे
तीने मात्र एक मित्र म्हणूनच माझी ओळख सांगावी
प्रेमात अशी अवस्था का व्हावी
तिलाच तिच्याबद्दल (तिलाच न कळता) भरभरून सांगावे
पण "ती" तूच आहेस हेही सांगता का न यावे ?
प्रेमात अशी अवस्था का व्हावी
जे सांगायचे त्या व्यतिरिक्त सर्वकाही सांगावे
महत्वाची गोष्ट मात्र मुखातून बाहेरच न यावी
प्रेमात अशी अवस्था का व्हावी
तिच्याशी बोलायला मनाने सर्व तयारी करावी
ती समोर आल्यावर जीभ का अडखळावी ?
प्रेमात अशी अवस्था का व्हावी
मी मैत्रीला प्रेम आणि तीने प्रेमाला मैत्री म्हणावे
मैत्री आणि प्रेमात अशी गल्लत का व्हावी ???
खरच...
प्रेमात अशी अवस्था का म्हणून व्हावी...???
khup experience kelela distey....masta ahe kavita...especially last para.... "maitri ani premat ashi gallat ka vhavhi" mast mast :)
ReplyDeleteHmmmmm Mitranche experience aahet maze nahi :-p
ReplyDeleteThanks Sonali :-)