आजचा अनुभव वेगळाच!!!
थोडा विचार करायला लावणारा आणि खूप काही शिकवून गेलेला...
आज पूजाच्या आग्रहाखातर जत्रेला जायचा योग आला( मनातून तसे जायचे नव्हतेच, शुक्रवारची संध्याकाळ पुढच्या २ दिवसांचे प्लान्स आखायचे कि राहतो त्याच्या उलट दिशेला जाऊन काही वेगळे करावे हा एक दिव्य प्रश्नच...) तर आम्ही हा ना करतच निघालो .
ज्या ठिकाणी जत्रा होती तेथे पोहोचलो,लहानपणी जत्रेमेध्ये सहभागी व्हायचो त्याची आठवण ताजी झाली आणि सारे काही Flashback सारखे आठवू लागले (नाही म्हतले तरी ७-८ वर्षे झाली जत्रेला जाऊन विविध पाळण्यात बसून... ते ओरडणे ते हसणे आणि बरेच काही कुठे तरी हरवून गेले होते )
पहिल्या पाळण्यात बसलो, त्याचे एक वैशित्ये होते , तो कोणत्या क्षणाला कोणत्या दिशेला वळेल याचा काही नेम नाव्ह्था ते आम्हाला त्यात बसल्यावरच कळले ( आपल्या आयुश्याचेही असेच नाही का ? पुढच्या क्षणाला काय होईल कोणाला ठावूक म्हणूनच ते जगायला हवे आणि त्यातली अन्शितता अनुभवायला हवी, त्यातच खरी मजा नाही का?) तर आम्ही सर्वच वेड्यासारखे म्हणा किव्वा लहान मुलासारखे म्हणा ओरडत होतो हसत होतो, कोणी आम्हाला बघ्तेये आहाला बघून हस्तेये याचा थोडा ही विचार मनाला शिवला नाही फक्थ त्या गोष्टीची मजा अनुभवण्यात आम्ही बुडून गेलो होतो. पाळणा जेव्हा थांबला तेव्हा वेगळेच चयतन्य अंगात शिरल्या सारखे झाले होते.( या नजीकच्या वर्षात मी कधी इतका हसल्याचा ओरडल्याचा योगच आला नव्हता असे वाटत होते , त्या ओरड्ण्यातून जो काही राग, इर्षा आणि मनात जे जे काही वाईट होते ते सारेच निघून गेल्या सारखे वाटत होते आणि मन थोडे हलके झाल्याचा साक्ष्त्कार होत होता (इथे थोडी अतिशययोक्तीच झाली :-p पण चालते कधी तरी :-p)
त्यानंतर योग आला तो आकाश पाळण्यात (Giant wheel ) बसण्याचा , त्यात बसण्याचा प्रत्येक वेळचा अनुभव वेगळाच पण पाळणा खाली येताना पोटात भीतीयुक्त गोळा येतो तो क्षणच अवर्णनीय, त्या एका क्षणात भीतीही वाटते आणि तो पोटात येणारा गोळाही हवा हवासा वाटतो. आकाशात गेल्यावर आजूबाजूला गोल गोल फिरणारे जग दिसू लागते सर्वच किती रम्य असते जणू आपण आकाशालाच हात लावतोय असा भास होऊ लागतो, पाळण्याचा, इतरांच्या ओरडण्याचा आवाजही नाहीसा होतो मनात वेगळेच विचार तरळू लागतात आणि वेडे मन फुलपाखरासारखे बागडू लागते त्यातच वेळ संपलेली असते आणि मी जमिनीवर आलेला असतो.
महागाई वाढलीये त्याची झळ तेथेही लागली , पाळण्यात बसण्याआधी इतके पैसे? असे नाकही मुरडले पण पाळण्यातून उतरल्यावर जे अनुभवले ते त्या कवडीमोल रुपयांपेक्षा कितीतरी पटींनी "मोलाचे" होते. तो आनंद, मनाला वाटेल तसे ( लहान मुलाला शोभेल असे) वागणे , बागडणे या पुढे सारे काही गौणच...
हा अनुभव तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच की इतक्या लहान लहान गोष्टीत इतका मोठा आनंद सामावलेला असतो याचा आपल्याला धकाधकीच्या दुनियेत विसर पडलेला असतो. देव अधे मध्ये त्याचे प्रात्यक्षिक घडवून आपल्याला सिग्नल देत असतो पण आपणच त्या लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्यातला मोठा आनंद गमावून बसतो. काहींना तर आनंद अनुभवायचे पण आहेत पण त्यात करण्या साठी त्यांचे हात मात्र साथ देत नाहीत मला त्यांना सांगावेसे वाटते एकदा आपल्या मनात आलेय मग ते नक्की करून पहा पैशाची चिंता बिलकुल करू नका कारण त्यातून मिळणारा आनंद हा त्या पैशातून मिळणाऱ्या एशोआरामापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे, ते अनुभवल्या शिवाय कळणार नाही.
(काही लहान गोष्टी ज्या मोठा आनंद देऊन जातात जीवनात )
समुद्र किनारी गेलात कपडांची पर्वा न करता भिजा पाण्यात, खेळा वाळूमध्ये , बनवा आपल्या स्वप्नांचे घर कोण आडवतय तुम्हाला ???
पाऊस पडतोय, जा भिजायला त्या साठी कसला मूड लागतोय ( तसे छत्री ब्यागेत ठेऊन मुसळधार पावसात भिजण्याची मजा काही औरच...)
आकाशात मस्त चांदणे पडलंय, जा गच्चीवर न्हाहून घ्या स्वताला त्या चांदण्यात, पैसे का लागतात त्यासाठी?
छान फुले फुलली आहेत त्यांचा सुगंध घायला कितीसा वेळ लागतो ???
आंघोळीच्या वेळी घ्यावे नाचून , गाऊन कोण मरायला येतेय तुम्हाला अडवायला.
सूर्योदय सूर्यास्त पाहण्यापासून कोणी अडव्लेय का तुम्हाला, करा व्यतीत थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात बघा थोडे त्याच्याशी बोलून.
भेट घ्या मित्रांची जा फिरायला त्यांच्याबरोबर हसा, खेळा बघा कसा वेळ निघून जातो ते किती आनंद मिळतो ते...
तर मग बघा हे सर्व करून ( वेळ मिळालाच तर :-p) स्वताच्या आनंदासाठी थोडा वेळ काढणे तरी जमेल असे वाटते. काय मग शोधणार न छोट्या गोष्टीतला मोठा आनंद... आणि जमलेच तर मला हि सांगा वरील गोष्टी व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या लहान गोष्टीत मोठा आनंद शोधला ते...
"स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
विश्वास उडाला कि आशा संपते ,
काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं..
म्हणून स्वप्नं पहा , विश्वास ठेवा आणि काळजी घ्या , आयुष्य खूप सुंदर आहे"
टीप : वरील ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्या पूर्णपणे माझ्या नाहीत.( काही माझ्या वाचनात आलेल्या आहेत )
पुस्तकांचे आणि इतर वाचन जास्त प्रमाणात झाल्यामुळे डोक्यात थोडी उल्थापालात झाली आहे त्यामुळे असे वेगळे विचार मनात येऊन आनंद शोधण्याचा प्रयत्न होतोय.
agdi sundar lihile aahe...
ReplyDelete