Monday, January 9, 2012

ह्याला जीवन ऐसे नाव

, ह्याला जीवन ऐसे नाव...



जगताना दुख सर्वांच्याच पदरी पडतात
त्यातून बाहेर निघून सुख अनुभवण्यालाच  जीवन असे म्हणतात

( प्रत्येक क्षण सुखी राहण्यात मजा नसते
सुखाच्या क्षणांना योग्यरीतीने अनुभवायलाहि  दुखाची किनार लागते


सुख दुख , अंधार आणि प्रकाशा प्रमाणे आहेत
जसा अंधारा शिवाय  प्रकाशाला  तसाच दुखाशिवाय सुखांना अर्थ नाही )

मिळालेल्या सुखांमुळे हुरळून जाणे, दुखांमुळे खचून जाणे खूपच सोप्पे आहे
परंतु मिळालेल्या धड्यामुळे शिकत जाण्यालाच जीवन असे म्हणतात

प्रेमात प्रत्येक जण यशस्वी होतोच असे नाही
त्या अपयशातून  खरे प्रेम करायला शिकण्यालाच  जीवन असे म्हणतात

आयुष्यात चांगली वाईट अशी अनेक माणसे भेटतात
चाग्लांकडून सुख आणि वाईटाकडून धडा शिकण्यालाच जीवन असे म्हणतात

देव प्रत्येकालाच सर्व काही देतो असे नाही
नसलेल्या गोष्टीचा  विचार न करता परीस्थितिशी   दोन हाथ करण्यालाच जीवन असे म्हणतात

प्रियजन्नाच्या  विरहाने दुखी होणे साहजिक आहे
त्यांच्या सोबत  व्यतीत केलेल्या सुखी क्षणांच्या आठवणीत समाधान मानण्यालाच  जीवन असे म्हणतात


Sunday, January 1, 2012

प्रेमात अशी अवस्था का व्हावी

                       
प्रेमात अशी अवस्था का व्हावी !!!

प्रेमात अशी अवस्था का व्हावी
तिच्या शिवाय   दुसरे काहीच का  न सुचावे ?
सारे असूनही तिच्या शिवाय   ह्या  जीवनात कमतरता का भासावी ?

प्रेमात अशी अवस्था का व्हावी
तिच्या केवळ दिसण्याने हृदयाची स्पंदने का वाढवीत ?
तिला भेटून आल्यावर रात्रभर झोप का न यावी ?

प्रेमात अशी अवस्था का व्हावी
तिला सोडून साऱ्यांनाच माझ्या  प्रेमाबद्दल  कळावे
तीने  मात्र एक मित्र म्हणूनच माझी ओळख सांगावी

प्रेमात अशी अवस्था का व्हावी
तिलाच तिच्याबद्दल (तिलाच न कळता) भरभरून सांगावे
पण "ती" तूच आहेस हेही सांगता का न यावे ?

प्रेमात अशी अवस्था का व्हावी
 जे सांगायचे त्या व्यतिरिक्त सर्वकाही सांगावे
महत्वाची  गोष्ट  मात्र  मुखातून बाहेरच  न यावी

प्रेमात अशी अवस्था का व्हावी
तिच्याशी बोलायला मनाने सर्व तयारी करावी
ती समोर आल्यावर जीभ का अडखळावी ?

प्रेमात अशी अवस्था का व्हावी
मी मैत्रीला प्रेम आणि तीने  प्रेमाला मैत्री म्हणावे
मैत्री आणि प्रेमात अशी गल्लत का व्हावी ???


खरच...
प्रेमात अशी अवस्था का म्हणून व्हावी...???